• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवासेना सचिव वरूण सरदेसाई ३० मार्च रोजी जळगाव दौऱ्यावर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 26, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण – युवासेना सचिव वरुण सरदेसाई “युवासेना निश्चय दौऱ्या” निमित्त बुधवार दिनांक ३० मार्च २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे. ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहरातील जिल्हा नियोजन भवन सभागृह येथे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिघं जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांना सिनेट निवडणुकी विषयी मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विद्यापीठ सिनेट निवडणूका युवासेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. युवासेना प्रमुख मा.ना.आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई विद्यापीठातील १० पैकी १० जागा मागे युवासेनेने जिंकल्या होत्या, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात युवासेना सिनेट निवडणूक लढवून विद्यार्थी हितासाठी भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहे. या साठी युवसेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात युवासेना निश्चय दौरा होत आहे.


जळगाव दौऱ्या वेळी युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या सोबत युवसेना कार्यकारीणी सदस्य अंकित प्रभू, युवासेना कार्यकारीणी सदस्या तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शीतल देवरुखकर शेठ, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव अविष्कार भुसे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, विस्तारक कुणाल दराडे, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, योगेश निमसे, विस्तारक किशोर भोसले आदी उपस्थित राहणार आहेत.
या सह कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, समाधान महाजन, महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे या सह तिघं जिल्ह्यातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.


दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव विराज कावडीया, युवासेना जळगाव लोकसभेचे जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, रावेर लोकसभेचे जिल्हा युवाधिकारी चंद्रकांत शर्मा, पंकज राणे, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, युवती सेनेच्या वैष्णवी खैरनार, जया थोरात, यशश्री वाघ आदी युवासैनिक परिश्रम घेत आहेत.

Tags: jalgaonyuva senayuva sena sachiv varun sardesai
Previous Post

जळगावात खून सत्र ; चाकूचे वार आणि मदतीसाठी याचना..

Next Post

31 मार्च पासून केंद्र सरकार विरुद्ध काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन..

Next Post

31 मार्च पासून केंद्र सरकार विरुद्ध काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!