• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरसोली प्र.न. येथील आरोग्य केंद्रासाठी ४ कोटींचा निधी : ना.गुलाबराव पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 30, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

पालकमंत्री यांच्या हस्ते पिंजारी समाज मंगल कार्यालयाचे लोकार्पण !

जळगाव राजमुद्रा दर्पण :- शिरसोली प्र. न. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामासाठी ४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात येणार असून याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. शिरसोली येथे पिंजारी बिरादरी अल्पसंख्यांक बहुउद्देशीय संस्था व युवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पिंजारी समाज मंगल कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच परिसरातील नागरिकांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच वीज उपकेंद्र (सबस्टेशन) देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शिरसोली येथे पिंजारी समाज मंगल कार्यालयासाठी मूलभुत सुविधा २५-१५ योजनेच्या अंतर्गत निधी प्रदान केला होता. या कार्यालयाचे आज लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. माजी सभापती नंदलाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते उमाजी पानगडे, मुस्ताक पिंजारी, रईस मेंम्बर, उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अर्जुन पाटील, अल्पसंख्याक सेनेचे अखिल मेंम्बर, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विनोद बारी,माजी उपसभापती मुरलीधर ढेंगळे, माजी सरपंच अनिल पाटील, रामकृष्ण काटोले, श्रावण ताडे, शाळेचे चेअरमन प्रवीण पाटील, सादिक पिंजारी, अबू खाटीक, सुनिल पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रारंभी पिंजारी बिरादरी अल्पसंख्यांक संस्था आणि युवा फाऊंडेशनच्या वतीने ना. गुलाबराव पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले. समाजासाठी भव्य हॉलची निर्मिती करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचा याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला.

पिंजारी समाज मंगल कार्यालयाचे लोकार्पण केल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मी शब्द दिल्यानुसार हॉल तयार झाला असून हॉलच्या समोर ६ लाख रूपयांचे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येतील असे ते म्हणाले. शिरसोलीसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी शिरसोली प्र. न. येथे ४ कोटी रूपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली असून याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ना. पाटील यांनी दिली. तर, येथील पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले असून यालाही लवकरच गती मिळणार असल्याची ग्वाही दिली. तसेच अलीकडेच चिंचोली येथे वीज उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले असून याचप्रमाणे शिरसोली परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी वीज उपकेंद्र (सबस्टेशन) उभारण्यात येणार असून याच्या निधीसाठी कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सचिन पाटील सर यांनी केले तर आभार मुस्ताक पिंजारी यांनी मानले.

Tags: gulabao patiljalgaon
Previous Post

विद्यार्थी हितासाठी सिनेट निवडणुका ताकदीने लढवा : युवासेना सचिव वरुण सरदेसाई

Next Post

त्या शिवसैनिकांना अटक करा : भाजपा महिला आघाडी

Next Post

त्या शिवसैनिकांना अटक करा : भाजपा महिला आघाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!