• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पारोळ्यात शेतकरी संघटनेचा रास्ता रोको व ठिय्या आंदोलन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 1, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

चार दिवसात रिक्त असलेली पदे भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे

पारोळा राजमुद्रा दर्पण | शिवतीर्थ समोर नँशनल हायवे क्र.नं 6 वर पारोळा तालुका शेतकरी संघटनेचे नेते डॉ.पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको व ठिय्या आंदोलनात करण्यात आले. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करुन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. सदर आंदोलन हे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पारोळा कृषी कार्यालयातील रिक्त असलेल्या तालुका कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी व इतर रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे असे शेतकरी संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन देखील दखल घेण्यात आली नाही म्हणून आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असे मत बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घ्यावे यासाठी जिल्हा उप कृषी अधिकारी जाधवर व तालुका कृषी अधिकारी वारे यांनी स्वता आंदोलन स्थळी भेट देत रिक्त असलेल्या पदांपैकी चार पदे ही त्वरीत चार दिवसाच्या आत भरण्यात येतील असे आश्वासन दिले व उर्वरित पदे ही टप्प्याटप्प्याने भरण्यात येतील असे पत्र कृषी विभागाकडून देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

पारोळा तालुका कृषी कार्यालयात रिक्त असलेल्या पदांबद्दल योग्य तो पाठपुरावा न केल्यामुळे आज शेतकरी संघटनेवर आंदोलन करण्याची वेळ आली. तालुका कृषी कार्यालयाला विविध योजना येऊन देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकत नसल्याने 3/4 किमी दुर असलेल्या या कृषी कार्यालयात शेतकरी पायपीट करत जातो परंतु निराशा पदरी घेऊन परत जावे लागते. पारोळा कृषी कार्यालयात अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून 44 कर्मचाऱ्यांची संख्या असतांना 114 खेड्याचा भार फक्त 8 कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने आठही कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागते. त्यामुळे दिलेले आश्वासन
कृषी विभागाने वेळीच पाळले नाही तर शेतकरी संघटनेच्या वतीने पुन्हा तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देत डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करत आंदोलन मागे घेतले. सदर आंदोलन हे पारोळा पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पि.एस.आय. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्तात करण्यात आले.

आंदोलनात बाळासाहेब पाटील, भडगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अभिमन हटकर, शहर उपाध्यक्ष मनोज परदेशी, अमळनेर तालुका शेतकरी संघटना उपाध्यक्ष नरेश चौधरी, पाचोरा जागृत जनमंचचे अध्यक्ष निलंकठ पाटील, उपाध्यक्ष गुलाब पाटील, कमांडो ईश्वर मोरे, राकेश वाघ, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, दौलतराव नाना व पदाधिकारी, पिरणकुमार अनुष्ठान, उमेश नाना, रामराव पाटील, भिम आर्मी संघटना तालुका प्रमुख जितेंद्र वानखेडे सह शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झाले.

Tags: jalgaonparolhashetkari aandolan
Previous Post

पारोळ्यात भाजप विरोधात महागाई मुक्त आंदोलन

Next Post

धक्कादायक : बोदवड तहसीलदारांसह तलाठी एसीबीच्या जाळ्यात ; महसूल प्रशासन हादरले..

Next Post

धक्कादायक : बोदवड तहसीलदारांसह तलाठी एसीबीच्या जाळ्यात ; महसूल प्रशासन हादरले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!