• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वतःला यशस्वी करण्यासाठी स्वतः मध्ये अनुशासन आणलेच पाहिजे : कुलगुरू डॉ विजयकुमार माहेश्वरी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 4, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | शहरात माहेश्वरी समाजाच्या वतीने रविवार दि.३ एप्रिल २०२२ रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हा माहेश्वरी समाजातर्फे प्रा. डॉ.विजयकुमार माहेश्वरी यांची कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चे कुलगुरू पदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. तसेच स्व.सौ. वनिता नारायण लाठी, महेश नगर, जळगाव याबद्दलची माहिती आणि प्रथम ५ इच्छुकांचे अर्ज स्विकारणे समारोह छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर, महाबळ रोड, जळगाव येथे आयोजित केला होता.

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माहेश्वरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामसुंदर सोनी, महेश आवास योजना समितीचे प्रमुख अशोक बंग, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीकिसन भन्साली हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

तसेच प्रदेश मंत्री मदनलाल मिनियार, महाराष्ट्र महेश सेवा निधीचे कार्याध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल, प्रदेश संयुक्त मंत्री विठ्ठलदास आसावा, प्रदेश सभेचे जनसंपर्कमंत्री ओमप्रकाश बजाज, प्रदेश माहेश्वरी युवक संघटन अध्यक्ष हार्दिक सारडा, प्रदेश युवक संघटन सचिव डॉ.गोविंद मंत्री, जळगाव जिल्हाअध्यक्ष एड. नारायण लाठी, जिल्हा सचिव माणकचंद झवर, धुळे जिल्हाध्यक्ष मिलिंद मुंदडा, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास माहेश्वरी, नंदुरबार जिल्हा सचिव विजय सारडा, माजी महापौर नितीन लढ्ढा, राधेश्याम कोगटा, सत्कार समिती प्रमुख संजय बिर्ला, जिल्हाध्यक्षा सौ.राधा झवर, जिल्हा सचिव सौ.संगीता चांडक, शहर अध्यक्ष योगेश कलंत्री, सचिव विलास काबरा, शहर महिलाध्यक्षा चंचल तापडिया, सचिव अरुणा मंत्री, युवक संघटना अध्यक्ष रुपेश काबरा, सचिव कौशल मुंदडा, शहर युवक संघटना अध्यक्ष मधुर झवर, सचिव अक्षय बिर्ला हे उपस्थित होते.

प्रस्तावना जिल्हाध्यक्ष एड.नारायण लाठी यांनी केली.कुलगुरू सरांचा नागरी सत्कार म्हणजे कबचौ उमवि परिक्षेत्रातील तीनही जिल्हे जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील समाजातील लोकांनी एकत्रीत येऊन कुलगुरू महोदयांचा सत्कार केला.वरील प्रसंगी प्रदेशाध्यक्ष श्रीकिसन भंसाली म्हणाले की समाजात समाजउपयोगी शिक्षा क्षेत्र आणि रहिवासी क्षेत्र यांचा एकत्रित विकास जर झाला तर त्याहून अधिक चांगली गोष्ट होऊ शकत नाही.

आपल्या उद्बोधनाथ महेश आवास योजना समितीचे राष्ट्रीय संयोजक अशोक बंग म्हणाले की मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा पैकी निवारा ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण आज पूर्ण करू शकतो आहे. अन्न, वस्त्र याकरिता शिक्षण क्षेत्र म्हणून आदरणीय कुलगुरू महोदय हे आपणास मार्गदर्शनास कायम तत्पर आहेतच.

आपल्या अध्यक्षीय भाषणात सभापती महोदय श्यामसुंदर सोनी असे म्हणालेत की कोरोना काळाने आपल्या सगळ्यांना पारिवारिक संकल्पना आणि त्याचे महत्त्व पटले आहे. ते पुढे म्हणाले कुलगुरू डॉ. विजयकुमार माहेश्वरी सरांच्या निमित्ताने जळगावातील आपल्या समाजाचा सत्कार आणि सन्मान झाला आहे. आपण सगळ्यांनी शिक्षण क्षेत्रात आपले नाव यशस्वी केले पाहिजे.

शेवटी आपल्या भाषणात कुलगुरू महोदय असे म्हणाले की आपण स्वतःला यशस्वी करण्यासाठी स्वतः मध्ये काहीप्रमाणात अनुशासन आणलेच पाहिजे. अनुशासन आणणे म्हणजेच वेळेचे महत्त्व, पैशाचे महत्त्व, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व जर का आपण पाळलेत तर आपण या वसुंधरेचे पाईक आहोत असे होईल. पुढील येणारा काळ हा तंत्रज्ञानाने नेतृत्व असणारा काळ असेल आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे, बदलत्या काळानुरूप आपल्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेचे महत्त्व वाढले पाहिजे, आपला भविष्यकाळ मग सुखद आणि सुंदर होईल.

मार्गदर्शनपर सत्रानंतर समाजातील वेगवेगळ्या सामाजिक संस्था तथा शैक्षणिक संस्था यांच्यातर्फे कुलगुरू महोदय यांचा सत्कार करण्यात आला.

सदरहू सत्कार समारंभास सुमारे एक हजार समाजीक बंधू- भगिणी उपस्थित होते.प्रा.डॉ.विजयकुमार माहेश्वरी सरांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सगळ्या समाजाने त्यांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली.महेश वंदना आयोध्यानगर माहेश्वरी बहू बेटी मंडळ यांनी गायली.आभार प्रदर्शन जिल्हा सचिव माणकचंद झवर यांनी मानले.

हा सर्व कार्यक्रम समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आणि पुढील पिढीच्या मार्गदर्शनासाठी आयोजित केला होता असे प्रा. संजय दहाड, प्रा. बी.जे. लाठी आणि सुत्र संचालक सौ. शेफाली लाठी यांनी कळविले आहे.

यशस्वीतेसाठी प्रा.संजय दहाड, मनीष झवर, ऍड.राजेंद्र माहेश्वरी, प्रदीप मणियार, दीपक लढ्ढा, केदार मुंदडा, रवी लढ्ढा, रोहन बाहेती, आशिष कासट, मधुर झवर, सागर मणियार, विजय झंवर, शिवा तोष्णिवाल, नरेंद्र काबरा, तेजस देपुरा तसेच जिल्हा सभेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Tags: jalgaonkavayatri Bahinabai North Maharastra Universitykulguru vijaykumar maheshvarimaheshwri samaj
Previous Post

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Next Post

युवासेनेतर्फे केंद्र सरकार अभिनंदन सोहळा करून महागाई विरुद्ध आंदोलन

Next Post

युवासेनेतर्फे केंद्र सरकार अभिनंदन सोहळा करून महागाई विरुद्ध आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!