• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यापीठ, महाविद्यालयांचे फलक मराठीत करा – युवासेनेची मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 8, 2022
in Uncategorized, जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि संलग्नीत महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांचे नामफलक मराठी भाषेत करावेत. विद्यापीठात स्वतंत्र मराठी भवन स्थापीत करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया यांच्या नेतृत्वात युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना देण्यात आले.


युवासेनेच्या मागणीला कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना तातडीने नामफलक मराठीत करण्याचे आदेश देण्यात येतील त्याबाबत लवकरच पत्रक काढण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी उपस्थित युवासैनिकांना दिले.
मा. शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राज्यातील सर्व आस्थापनांच्या आणि खाजगी दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत करण्यात याव्यात, असा कायदा केला आहे. या कायद्याची अंमलबजावणीही राज्यात सुरू झाली आहे. मात्र विद्यापीठाच्या पातळीवर असे होताना दिसून येत नाही. विद्यापीठातील सर्व अधि विभागांची नावे ठळक अक्षरात मराठीत करण्यात यावीत. विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांची नावे मराठीत लिहिण्यात यावीत. विद्यापीठातील विधी विभागाचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यात यावे. अशी मागणी युवा सेनेच्या माध्यमातून करण्यात आली.


महोदय, आपणास माहित आहेच की, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, मराठी भाषेला चालना मिळावी यासाठी आपल्या विद्यापीठाची स्थापना 15 ऑगस्ट 1990 रोजी करण्यात आली होती. मात्र स्थापनेनंतर आजपर्यंत हा उद्देश पूर्ण झाला नाही, किंबहूना त्यासाठी फारसे प्रयत्नही केले गेले नाहीत. विद्यापीठात जगातील अन्य भाषा शिकता येतात, ही अभिमानाची गोष्ट आहे. पण, आपल्या मातृभाषेकडे अक्षम्य दुर्लक्ष सुरू आहे. विद्यापीठात स्वतंत्र मराठी भाषा भवन स्थापन करण्यात यावे.


यावेळी युवासेना सहसचिव विराज कावडीया, जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, युवती सेनेच्या वैष्णवी खैरनार, जया थोरात, जितेंद्र बारी, अमित जगताप, यश सपकाळे, शंतनू नारखेडे, गिरीष सपकाळे, भुषण सोनवणे, अमोल मोरे, प्रितम शिंदे, विद्यापीठ युवाधिकारी अनिकेत पाटील, ॲङ अभिजीत रंधे, यश सोनवणे, मयूर रंधे, सागर पाटील, ध्रृवा पाटील, पुष्पक सुर्यवंशी आदि युवासैनिक उपस्थित होते.

Tags: jalgaonjalgaon citykavayatri Bahinabai North Maharastra Universityyuvasena
Previous Post

यंदा नूतन मराठा महाविद्यालयात सुवर्ण महोउत्सवी वर्ष ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जैन इरिगेशनचा गौरव

Next Post

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जैन इरिगेशनचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!