जळगाव राजमुद्रा वृत्त सेवा | जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून महापालिकेला 61 कोटींचा भरीव निधी दिला आहे, मनपा मध्ये सत्तापालट झाले आणि शिवसेनेच्या महापौर पदी जयश्री महाजन यांची वर्णी लागली मात्र ज्या जोरावर शिवसेनेने मनपा वर भगवा फडकविला त्याचे मुख्यतः कारण हे निधी वाटपाचा भेदभावच आहे हे सेनेने विसरायला नको, भाजप मधून बंडखोरी करीत शिवसेनेला पाठींबा जाहीर केलेले नगरसेवक देखील त्याच कारणावरून फुटलेले आहेत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर शरसंधान करून ” माजी मंत्री महाजनांनी जळगाव ची वाट लावली”असे व्यक्तव्य केले. मात्र त्याच महाजनांनी शिवसेना प्रणित खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांकडून 25 कोटींचा भरीव निधी शहरासाठी आणला पण तो वेळेत खर्च करता आलेला नाही, त्यामध्ये देखील राजकारण आडवे आले. निधी परत जाण्याची वेळ मनपातील तेव्हाच्या आणि आताच्या सध्या स्थित सत्ताधाऱ्यावर आली म्हणून ” महापालिकेत निधी आला खरा मात्र त्या निधीचे राजकारण व्हायला नको ” याची काळजी पालकमंत्र्यांनी घ्यावी हीच अपेक्षा जळगावकरांची आहे.
त्याची पुनरावृत्ती नको
जळगावकर नागरिकांनी विकासाच्या मुद्यावर भाजपला भरभरून मतदान केले व सत्तेतदेखील बसविले मात्र निधी तसेच ठेके देण्याच्या वादावरून नगरसेवकांमध्ये गट बाजी उफाळून आली विशिष्ट अशा नगरसेवकांना माजी मंत्री महाजनांनी मनपाची सर्वाधिक जबाबदारी टाकून महत्वाची पदे दिली, त्यांना मनपाचा गाढा हकलताना अपयश आले. त्यात महाजनांचे देखील दुर्लक्ष झाले हे खरेच आहे सातत्याने पक्षाकडून मिळणाऱ्या जबाबदाऱ्या तसेच राज्यात घडणाऱ्या महत्वपूर्ण घडामोडींमध्ये सहभाग हेच मुख्य कारण समोर येतात. यामुळे पक्षात येवढे नगरसेवक नाराज याकडे प्रकर्षाने दुर्लक्ष करण्यात आले. सत्तांतराला “चमत्कार” जरी म्हणत असले तरी जळगावकरांना ह्या अडीच वर्षांत विकासाची अपेक्षा आहे,त्याची पुरानवृत्ती महापालिकेत व्हायला नको याची काळजी सेना नेत्यांना घ्यावी लागणार आहे.
प्रलंबित अमृत योजना ..
गेल्या अनेक दिवसांपासून अमृत योजनेचे काम प्रलंबित आहे याकडे मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे दुर्लक्ष झालेले दिसून येते पाणी पुरवठा सारखे महत्वपूर्ण खाते असताना योग्य ते नियोजन मंत्री पद आल्यापासून पालकमंत्र्यांनी केलेच नाही शहरात सर्वाधिक खड्डे हे अमृत योजनेमुळे पडले आहे अनेक अपघात अमृत योजनेच्या खड्यांमुळे झाले नागरिक देखील ह्याच खड्यांमुळे वैतागल्यागत झालेले आहे.अनेकांना शारीरिक व्याधी उत्पन्न झाल्या यामुळे आधीच अडचणीत असलेल्या जळगावकरांना समस्यांना तोंड द्यावे लागले पालकमंत्र्यांनी अमृत योजनेचा आढावा घेऊन आढावा घेऊन लवकर कामे कसे पूर्ण होतील व जळगावकरांना चांगले रस्ते कधी उपलब्ध होतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.