जळगाव राजमुद्रा दर्पण | शहरातील सिंधी कॉलनीत बंद घरातून पाच लाखांचा ऐवज लांबविणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना तांबापुरातुन अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की शहरातील सिंधी कॉलनीतील साधना आश्रम जवळील कंवरनगरातील रोहित इंद्रकुमार मंधवानी हे कुटुंबियांस त्यांचा आत्याच्या मुलाच्या लग्नासाठी अमरावती येथे गेले होते. दरम्यान २६ एप्रिल रोजी लग्नकार्य आटोपुन घरी आले असता. त्यांना घराच्या मुख्य दरवाजा कडी-कोयंडा तुटलेला दिसुन आला, त्यांनी घरात जावुन पाहणी केल्यानंतर त्यांना घरातील लोखंडी कपाटातुन रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने आणि मिक्सरच्या मोटार असा (एकुण ४ लांख ९७ हजारांच्या ) ऐवज लांबविल्याचे दिसुन आले. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे तांबापुरा भागात राहत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची पथक रवाना केले. संशयित आरोपी समीर हनिफ काकर,(वय-२०) आणि त्याच्या साथीदार अन्सार अशा रुबाब (वय-१९) रा. तांबापुरा यांनी तांबापुरात अटक करण्यात आली दोघांनी घरफोडीची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी दोघांना एमायडिसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. (यांनी केलेली कामगिरी) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल देवडे, पोहेका. विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने केली.