नागपूर राजमुद्रा दर्पण | नागपूरच्या पोलीस भवनाच्या कार्यक्रम पत्रिकेत तुरुंगात असलेल्या अनिल देशमुखांची नाव छापण्यात आल्याने राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. अनिल देशमुख हे सध्या विद्यमान आमदार असून गृहमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी दिला आहे असे असताना देखील नागपूर पोलीस भवनाच्या कार्यक्रम पत्रिकेत आमदार म्हणून त्यांचं नाव देण्यात आले आहे. अनिल देशमुख सध्या तुरुंगात असून अनेक घोटाळ्यांचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर न्यायालयात खटले देखील सुरू आहे.
माजी गृहमंत्री असलेले अनिल देशमुख हे जर तुरुंगात आहे तर नागपूर पोलिसांच्या कार्यक्रमात कशी लावणार अशी एकंदरीत चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. 29 एप्रिल दुपारी 1 वाजता नागपूर पोलिसांकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सन्माननीय उपस्थिती मध्ये छापण्यात आलेल्या नावांमध्ये अनिल देशमुख यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नागपूर पोलीस भवनाचे उद्घाटन होणार आहे. नागपूर मध्ये हा सोहळा पार पडणार असून त्याचप्रमाणे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री सतेज पाटील, आणि शंभूराज देसाई यांचीही नावे कार्यक्रम पत्रिकेत देण्यात आली आहे.
या पत्रिकेत अनिल देशमुख यांची नावे देण्यात आली याप्रकरणी अद्याप पर्यंत नागपूर पोलिसांकडून कुठलाही खुलासा देण्यात आलेला नाही, मात्र जेल वारी करीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत आल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात देशमुख खान बद्दल चर्चांना उधाण आले आहे.