औरंगाबाद राजमुद्रा दर्पण | शहरात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भव्य सभा होणार आहे या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांकडून अनेक अटी शर्यती देऊन सभेला परवानगी देण्यात आली आहे. या सभेमध्ये लाखोच्या संख्येने मध्ये नागरिक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे व मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत, या नोटीसमध्ये अनेक जातक अटी पोलिसांनी लावल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी बाबत अनेक संभ्रम व्यक्त करण्यात आले होते, मात्र असे असताना पोलिसांकडून अखेर औरंगाबाद शहरात सभेला परवानगी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून ही सभा चर्चेचा विषय ठरले आहे. या सभेच्या परवानगीसाठी मनसे नेते मैदानात उतरले होते, अनेक संघटनांकडून या सभेला प्रचंड विरोध करण्यात आला होता. धार्मिक तेढ निर्माण होण्याचे कारण देत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस देखील सर्व बाबींची पडताळणी करून परवानगी देण्याच्या पावित्र्यात होते मनसे पदाधिकारी तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांना महत्त्वाच्या त्या तीन अटी शर्यती पाडणे अवघड असल्याची राजकीय सुरु झाली आहे.
औरंगाबाद पोलिसांनी या अति शर्यतीमध्ये सगळ्यात अवघड अशी अट देण्यात आली आहे. याचवेळी वापरण्यात येणारे साऊंड सिस्टिम बाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल म्हणजेच औद्योगिक क्षेत्रात 75 डेसिबल, व्यापारी क्षेत्रात 65 डेसिबल, निवासी क्षेत्रात 55 डेसिबल आणि शांतता क्षेत्रात 50 डेसिबल आता राज ठाकरे बोलायला उभे राहिले की त्यांनी आवाजाची मर्यादा कोणत्या आधारे पाडायची हा एक प्रश्नच आहे. कारण राज ठाकरे यांना धडाडणार आवाज म्हणून ओळखले जाते असे असताना डेसिबल ची मर्यादा पाळणे अवघड जाणार आहे.
या सभेसाठी दुसरी मोठी अट पोलिसांकडून लावण्यात आली आहे. या सभेसाठी फक्त पंधरा हजार लोकांना बोलवता येणार आहे. मात्र राज ठाकरेंची सभा म्हटलं की मैदान तुडुंब भरतात तसेच परराज्यातून जसे की आयोध्य तून काही हजारांमध्ये लोक या सभेसाठी येणार आहेत, अशावेळी ही मर्यादा पाडणे मोठे आव्हान राज ठाकरेंकडे असणार आहे.
याबद्दल तिसरी अट म्हणजे जातीय तेढ निर्माण होऊ नये, आणि प्रक्षोभक भाषण होऊ नये असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या सभेला अनेक संघटनांनी विरोध केला असताना राज ठाकरे यांच्या भाषणामुळे धार्मिक तेढ निर्माण होईल असा आरोप या संघटनांकडून करण्यात आला होता. सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, धर्म, भाषा, वर्ण, प्रदेश जन्मस्थान, धर्म यावरून चिथावणीखोर वक्तव्य करू नये असे सांगण्यात आले आहे. मात्र राज ठाकरे यांची शिवतीर्थावरील सभा पाहिली आणि त्यानंतर मग यांबाबत भूमिका पाहिली तर ही अट देखील राज ठाकरे कसे पाळणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.