चाळीसगाव राजमुद्रा दर्पण | शहरात किर्तनसेवा सूरू असताना महर्षी नारदांच्या गादीवर थेट बुटासकट चालून जावून पोलिस अधिकाऱ्याने कीर्तनकारसह सेवाकरिंना धमकावल्याचा व नारदाच्या गादीची विटंबना केल्याचा प्रकार घडल्याने संत व किर्तन परंपरेच्या श्रध्दा व भावनेला ठेच पोहचविल्याची घटना घडली आहे. या मुजोर अधिकारीच्या निलंबनाची मागणी कीर्तनकार व वारकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.अनवधानाने व गादीचे महत्त्व माहीत नसल्यानें कर्तव्य बजावताना ही चूक घडली व त्याबद्दल त्या अधिकाऱ्याने आ. चव्हाण यांच्यासह काही वारकरी संप्रदायाच्या मंडळीसमोर माफीही मागितली. परंतू वारकरी व किर्तनकार संघटना निलंबनाच्या मागणीवर ठाम असल्याने हे प्रकरण अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
मूळात महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. त्यामुळे या मातीत जन्मलेला प्रत्येक जण या संस्कृतीत , संत परंपरेच्या विचारसरणीत वाढलेला आहे. तसेच त्याचे बीजारोपण जन्मापासून प्रत्येकात उपजत तर झालेच आहे.किंबहुना पहिल्या वर्गापासून त्याविषयीची विचारधारा वाघिणीचे दूध म्हटल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाला अवगत करून देण्याच्यासाठी येथल्या शिक्षण व्यवस्थेकडून अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तशी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
त्यामुळे येथील संत परंपरा, अन् त्या परंपरेतून शेकडो वर्षापासून समाजप्रबोधनाचे माध्यम असणाऱ्या कीर्तन परमपरेबद्दल ज्ञात नसलेला या भूमीत जन्मलेला असा एकही माणूस नाही. अशा परिस्थितीत, अशा संस्कृतीत, अशा वातावरणात वाढलेला एखादा उच्च शिक्षित अधिकारी जर कीर्तन परंपरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वर्षानुवर्ष सुरू असताना, साधू संतांनी घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करताना जर असं म्हणत असेल की, मला कीर्तन परंपरेतील नारदाच्या गादीचे महत्त्व माहीत नाही. तर अशा अधिकारीच्या अज्ञानपणाची कीव करावीशी वाटते.किंबहुना तितकीच त्याची ही कृती हिंदू संस्कृती व अध्यात्माच्या ध्येय धोरणांची विटंबना करण्याच्या हेतू बद्दल शासंकता निर्माण करणारी देखील नक्कीच आहे. रस्त्याने चालताना एखाद्या दगडावर गुलाल जरी पडला असेल तरी त्याला नमस्कार करून पुढे जाणारी आम्ही महाराष्ट्राची संस्कृति जोपासणारी माणसं. बोकड बळीच्या नवसाच्या ठिकाणि देखील पादत्राणे बाजूला काढून श्रद्धा बाळगणारे जर आम्ही महाराष्ट्रीयन असु तर मग अशावेळी समाज प्रबोधन करण्यासाठी कीर्तन सेवा सूरू असताना बुटासकट एखादा पोलिस अधिकारी नारदाच्या गादीवर चालून जावून, समाजात शांती,सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, समाजाला व्यसनापासून दूर सारून जेणेकरून गुन्हेगारी कमी होइल व राज्याच्या गृह खात्यावरील ताण तणाव दूर होइल यासाठी प्रयत्न करणाऱ्या शांती दुतानाच धमकवण्याची दुर्दैवी, तितकीच चीड निर्माण करणारी कृती करतं असेल तर नेमक हे कशाच घोतक म्हणावं? हा प्रश्र्न आहे. चाळीसगांव मध्ये घडलेला हा प्रकार जितका निंदनीय आहे तितकाच तो गर्व आणि गुर्मी बरोबरच राजकिय संसर्गाच्या प्रभावाने वाढीस लागत असल्याचही घोतक आहे .
अशा संतप्त भावनाही आता जनमानसात व्यक्त होताना दिसत आहेत. या प्रकारावर पांघरून घालून आपले अवैध धंध्यातले संबंध अबाधित राखण्यासाठी काही मंडळींकडून आता पाठराखण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मूळात येथे धर्माधर्मात तेढ निर्माण करणारं प्रबोधन मुळीच केलं जात नव्हतं. (जे मदरस्यांमध्ये दिलं जातं असं म्हणतात) येथे कुणी समाजा समाजात तेढ निर्माण होईल अशी प्रक्षोभक भाषणही कुणी करत नव्हतं. अन् किर्तन परंपरेला आजतागायत उभ्या महाराष्ट्रात कुठं गालबोटही लागलेलं नव्हतं. जे आज खुद्द शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडूनच लावलं गेलं. सर्वाधिक संतापजनक गोष्ट जी या मुजोर अधिकाऱ्याकडून घडली ती म्हणजे हिंदू संस्कृतीत व वारकरी संप्रदायात किर्तन सेवा प्रसंगी नारदाच्या गादीला अनन्य साधारण महत्त्व तितकच श्रध्देच स्थान आहे. ज्याचा आजतागायत अनेकदा येड्यागबड्या व पेदाडांकडूनही नमस्कार करून सन्मान राखला गेला आहे.
त्यामुळें या उच्च शिक्षित पोलिस अधिकारीची कृती अनवधानाने, अज्ञानपणाने असूच शकत नाही. एखादा व्यक्ती एखादया धर्मात जन्माला येवून धर्माच्या तत्वांना महत्त्व देत नाही. संस्कृति अन् संस्काराला विसरतो अशा व्यक्तीला आपण सहज धर्म विरोधी किंवा निधर्मी असं म्हणतो. अन् अशी व्यक्ती समाज व्यवस्था त्यातील एकता, शांती व सुव्यवस्था बिघडवन्याला सतत कारणीभूत ठरत असते असं म्हटलं जातं. मग जर अशा विचाराची म्हणा कि त्या विचाराने कुणाच्या सांगण्यावरून चालणारी व्यक्ती प्रशासनात काम करत असेल. तर अशा व्यक्तीच्या वागण्यामुळे उद्भवणाऱ्या वादाचा सर्वाधिक ताण , नामुष्की खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिक त्रासदायक ठरत असते.
आधीच हनुमान चालीसा अन् भोंग्याच्या चक्रव्यूहात पोलिस प्रशासन चिंतेत आहे.त्यात परत खात्यातल्याच माणसाकडून उपद्व्याप वाढल्याने जिल्हा पोलिस प्रशासन अधिक अडचणींत सापडण्याची चिन्हे आहेत. त्यात संबंधित अधिकारी हा पालकमंत्र्यांच्या जवळचा असल्याचं सांगितलं जात असल्यानं प्रशासनाला इकडं आड तिकड विहीर अशी जरी परिस्थिती असेल तरी जिल्ह्याची शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संबंधित अधिकारीवर कारवाई करणही तेव्हढच गरजेचं आहे. संबंधित अधिकारीस तत्काळ निलंबित करण्याच्या मागणसाठी वारकरी व कीर्तनकार आज् जिल्हयातील प्रत्येक तालुक्यावर आंदोलन छेडणार असल्याचे सूतोवाच कालच ह. भ. प. जळकेकर महाराज यांनी केले होते. त्यामुळे प्रशासनाला कारवाई करावी लागेल. अन्यथा या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटन्याची शक्याता नाकारता येणार नाही.