आयुक्तांच्या कामकाजाबद्दल केला निषेध व्यक्त
जळगाव राजमुद्रा दर्पण | महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्या नंतर महापालिकेच्या सभागृहांमध्ये निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभामध्ये मनपा अधिकारी तसेच काही नगरसेवक महापालिका कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता, मात्र यामध्ये अचंबित करणारी अशी घटना घडली आहे. याविषयीची मनपा वर्तुळात चर्चा रंगली होती.
नगरसेवक चेतन सनकत यांनी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यावर मनपा कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिल्याचा आरोप करीत संपूर्ण महापालिकेसह आयुक्तांवर गोमूत्र फवारणी करणार होते. यामध्ये आयुक्तांच्या निषेध व्यक्त करण्यासाठी काळे कपडे देखील परिधान केले होते. मात्र जेष्ठ नेत्यांच्या मध्यस्तीमुळे गोमूत्र फवारणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
मात्र ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्या मध्यस्थीमुळे गोमूत्र फवारणी चा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे नगरसेवक चेतन सनकत राजमुद्राशी बोलताना सांगितले.
महापालिकेचे मावळते आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आज देखील काही कर्मचारी व अधिकारी यांना चुकीच्या पद्धतीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापूर्वी देखील महापालिका कर्मचार्यांवर अन्याय कारक कारवाई केली असल्याचा आरोप नगरसेवक चेतन सनकत यांनी केला आहे. सातत्याने मनपा कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ आज महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या निरोप समारंभ होत असतांना मनपा प्रांगणात निषेधाचे काळे कपडे परिधान करून ढोल वाजत आनंदोत्सव साजरा करीत असल्याचे नगरसेवक सनकत यांनी सांगितले आहे.