जळगाव राजमुद्रा दर्पण | मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा तीन वेळा झेंडा बदलून व अनेक वेळा वेगवेगळ्या भूमिका बदलत असतात त्यांना यश मिळत नाही असे असताना हा देखील त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलणे सुरु केली आहे. राज ठाकरे हे भाजपचे एजंट म्हणून काम करीत असल्याचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची रेकॉर्डब्रेक सभा होणार आहे. या सभेची मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये व महाराष्ट्रातील जनतेला प्रचंड उत्सुकता लागली आहे. राज ठाकरे नेमकी काय ? भूमिका घेतात याकडे आता महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.
राज ठाकरे सभा घेत असतात त्यांना त्याचा छंद आहे. तो त्यांनी जोपासावा, राज ठाकरे यांच्या पक्षाला यश मिळावे म्हणून ते सातत्याने प्रयत्न करीत आहे त्या पार्श्वभूमीवर काहीतरी बस्तान व्हावे म्हणून यासाठी त्याची धडपड सुरू असल्याचा हल्लाबोल राज्याचे महा विकास आघाडीचे मंत्री पाटील यांनी राज ठाकरेंवर केला आहे.
औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांचे जाहीर सभा होणार आहे. यासाठी कायदा-सुव्यवस्था खराब व्हायला नको म्हणून औरंगाबाद पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. सभेपूर्वी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राज ठाकरे यांना पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा अनर्थ नको अथवा कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी नोटीस बजावली आहे.