मुंबई राजमुद्रा दर्पण | मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा मुद्यांवर राज्यात राजकीय वादंग पसरले आहे. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा राज्यात जोरदार जात असताना राज ठाकरे लोकांपर्यंत आपली भूमिका मांडण्याची यशस्वी झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा कडे लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेच्या सर्व प्रमुख नेत्यांना मराठवाड्याकडे लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांना मराठवाड्याकडे अधिक लक्ष द्यावे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मराठवाडा कोणत्याही परिस्थितीत अस्तित्व अबाधित राहावा यासाठी शिवसेना कामाला लागली आहे.
मराठवाड्यावर सर्वाधिक लक्ष देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बैठकीचा सपाटा लावला आहे प्रत्येक मंत्री तसेच प्रमुख नेत्यांना पक्ष कार्यासाठी सूचना देण्यात आले आहे.
नवे संपर्क प्रमुख नेमले जाणार ,पूर्वी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष द्यावे , नांदेड परभणी जालना काबिज करा ,खासदारांनी शिव संपर्क अभियानाचा अहवाल सादर करावा,बैठकीत मराठवाडा विदर्भातील पक्ष वाढीवर चर्चा असे विविध मुद्दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आले याबाबत तात्काळ अहवाल देखील नेतृत्वाकडे सादर करण्यात यावा असे आदेश देखील शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य पोह्यांच्या मुद्द्यांवरून मोठे राजकीय वादळ उभे केले आहे. यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी मनसेची व्यूहरचना सुरू असल्याचे सध्या राजकीय चर्चा आहे. यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्य करण्यासाठी 8 जून औरंगाबाद मध्ये सभेचे आयोजन केले आहे. या सभेमधून राज ठाकरेंच्या सभेला कराराच्या बापमाणूस शिवसेनेकडून तयारी सुरू झाली आहे.