जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भाजपचे आणखी पाच ते सात नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त हाती आले आहे, या पूर्वी 27 नंतर 3 आणि आता पाच ते सहा नगरसेवक मंगळवारी शिवसेनेत मध्ये प्रवेश करणार आहे मुख्यमंत्री उद्धव टाकरे मंगळवारी वेळ निश्चित करून भाजप नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देणार आहे एका मागे अनेक नगरसेवक सेनेची वाट धरत असल्याने भाजपमध्ये कमालीची अस्वस्था पसरली आहे नेतृत्वाचे दुर्लक्ष व विश्वासात न घेणे निधी देताना झालेला उशीर अशी विविध कारणे शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकां कडून दिले जात आहे.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांना रोखलं जाणार नाही यासाठी प्रयत्न देखील होणार नाही मात्र पुढील कायदेशीर परिनामा करीता फुटीर नगरसेवकांनी तयार रहावे, तेव्हा मात्र कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे भाजप नेतृत्वाकडून सांगण्यात आले आहे.
मुक्ताईनगर च्या भाजप नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशा नंतर पुन्हा एकदा भाजपला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे जळगाव महापालिकेतील एकूण तीन नगरसेवकांनी शिवसेनेत भाजपाच्या तिन नगरसेवकांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन सुरेश सोनवणे, सौ शोभा बारी, शेख हसिना शेख शरीफ यांनी शिवसेना सचिव विनायकजी राऊत, संपर्क प्रमुख विलासजी पारकर, संजय सावंत, मोहन म्हसळकर, उपमहापौर कुलभुषण पाटील उपस्थित मध्ये प्रवेश केला आहे.