जळगाव राजमुद्रा दर्पण | शहराच्या राजकारणात लवकरच मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव शहरातील राजकीय पक्षांमध्ये यासंदर्भात खलबते सुरू असून मोठी व्यूहरचना आखली जात आहे. अनेक जणांचे झालेले पक्षांतर यामुळे शहराच्या राजकारणावर झालेले परिणाम तसेच विकासावर खुंटलेले काम यामुळे काहीं नाराजांनी पुन्हा एकदा आपले राजकीय बाशिंग गुडघ्याला बांधले आहे. या राजकीय उलथापालथ मुळे अनेकांची राजकीय कोंडी तसेच अनेकांचे मार्ग मोकळे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शहरात सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागले आहे. त्यामुळे शहराच्या राजकारण देखील मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता आहे यासाठी जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे देखील बोलले जात आहे.
यासंदर्भात दोन पक्षांच्या पक्षीय यंत्रणा कामाला लागल्या असून गणित जुळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. होणाऱ्या उलथापालथ यामध्ये राजकीय गणिते तोडल्यास अनेकांच्या लॉटरी लागण्याची शक्यता आहे त्यामध्ये अनेकांची पदोन्नती देखील होणार आहे. ही सर्व उलथापालथ होण्यामागे दोन्ही राजकीय पक्षातील अंतर्गत वादाची किनार याला देण्यात आली आहे. पक्षीय धोरणाविरोधात गेलेल्या अनेकांना यामध्ये चपराक बसणार आहे. यासोबतच पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना देखील लगाम लावण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या वृत्तामध्ये सूत्रांनी दिलेली माहिती ही अटी शर्यतीवर असून राजकीय उलथापालथ होणार असल्याने यामध्ये व्यक्ती, पक्ष आणि सूत्र यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही.