जामनेर राजमुद्रा दर्पण | जामनेर विविध कार्यकारी सहकारी संस्था जामनेरची पंचवार्षिक निवडणूक मागील महिन्यात नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपा,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या सहकार पॅनल राष्ट्रवादी शिवसेनेच्या शेतकरी पॅनल विरोधात पुर्ण १३ जागांवर एक हाती सत्ता मिळवली सहकार पॅनेलचे नेतृत्व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन व माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी केले होते.
तर शेतकरी पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे संजय गरुड यांनी केले अतिशय प्रतिष्ठेची झालेली निवडणूक सहकार पॅनलने जिंकली. आज या संस्थेच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन पदासाठी विशेष सभेचे आयोजन निवडणूक निर्णय अधिकारी डि.व्हि. पाटील यांनी केले होते. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून चेअरमन पदासाठी राजेंद्र रघुनाथ भोईटे तर व्हाईस चेअरमन पदासाठी नाना केशव माळी हे दोनच अर्ज आल्याने दोघांची एक मताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डी व्ही पाटील यांनी जाहीर केल.यावेळी माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक विजय दामोदर सोनवणे, गोपाल पाटील सर,पांडुरंग माळी ,देवराम चौधरी, गोविंदा विष्णू धनगर ,जावेद आ.वाहेद, प्रदीप गायके, स्नेहांकिता,जगन्नाथ लोखंडे, माधुरी दिनेश लखोटे, जगन सुरडकर हे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.संस्थेचे सचिव निकम, लिपिक नामदेव माळी, शिपाई बाळासाहेब नेमाडे हजर होते.