जळगाव राजमुद्रा दर्पण |दिनांक 10 मे रोजी दुपारी ३वाजता भारतीय रेल्वे बोर्ड भारत सरकार PAC कमिटी सदस्यांनी जळगाव रेल्वे स्थानकावर भेट दिली.
कमिटी सदस्यांचे जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे भा. ज. पार्टी जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. तसेच जळगाव रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत अडी अडचणी समिती सदस्यांना सांगितल्या.तसेच उद्योजक, व्यापारी ,प्रवासी संघटना यांनी आपल्या अडीअडचणी समिती समोर मांडल्या. विशेष करून आमदार राजूमामा भोळे व दीपक सूर्यवंशी यांनी बिग बाजार या भागाकडील गेल्या दीड ते दोन वर्षापासून मार्ग बंद असल्याने.जेष्ठ नागरिक, दिव्यागं व सर्व सामान्य प्रवाशांचे खुपच हाल होत असून, सदरील गेट खुले करण्यात यावे अशी विनंती समिती सदस्यांसमोर मांडली.या समितीमध्ये श्री राजेंद्र फडके, श्री छोटू पाटील सुरत, श्री कैलास जी वर्मा मुंबई, श्री अभिलाश जी पांडे जबलपुर, हे सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी कमिटी सदस्य डॉ राजेंद्र फडके यांनी सांगितले, कि जळगाव रेल्वे स्थानकांवर अजुन एक खिडकी, वाढवण्यात आली असुन त्यात दिव्यागं व आमदार, खासदार यांच्यासाठी ही खिडकी असेल असे सांगितले. तसेच रेल्वे प्रशासनाशी तात्काळ चर्चा करुन सदरील बीग बाजार कडील गेट सर्व सामान्य जनतेसाठी खुले करण्यात यावे अश्या सूचना दिल्या. सूचनेने रेल्वे प्रशासनाने तत्काळ पालन करून बिग बजार कडील गेट काढून नागरिकांसाठी मार्ग मोकळा केल्याने नागरिकांनी आभार व्यक्त केले .
या प्रसंगी व्यापार आघाडीचे श्री अशोक राठी,भाजपा महिला सरचिटणीस श्रीमती रेखा ताई वर्मा, श्री अमित देशपांडे, प्रकाश जी पंडित व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.