गोंदिया राजमुद्रा दर्पण |महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून असा एकही दिवस नाही की, भाजप आणि राष्ट्रवादीने एकमेकांवर आरोप केले नसतील. आणि या सर्व गोष्टींना अपवाद ठरला तो गोंदिया येथे राष्ट्रवादीचा झालेला कार्यक्रम.
कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यानी हजेरी लावल्यामुळे सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया शिक्षण संस्थेत सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सत्कारमुर्ती म्हणून दुसरं-तिसरं कोणी नसुन भाजपचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह हे होते. समारंभ राष्ट्रवादीचा आणि हजेरी भाजपची यामुळे राज्यभरात कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या युतीची तयारी तर नव्हे अशी कुजबुज सर्वत्र सुरु आहे. परंतु स्वत: शिवराजसिंह चव्हाण यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
चव्हाण म्हणाले की, गोंदियाच्या गुणांमुळे मध्यप्रदेशात महक येते. त्यामुळेच मी गोंदियात नेहमी येतोय. गोंदिया शिक्षण संस्थेने माझा जो सत्कार ठेवला, हा प्रेमाचा असून राजकारणाशी याचा काहीही संबंध नाही. दरम्यान यावेळी त्यांनी राजकीय भाष्य टाळत, गोंदिया शिक्षण संस्थेचा मध्यप्रदेशात विस्तार करण्यास मदत करणार असे आश्वासनही दिले.