पुणे राजमुद्रा दर्पण | प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्या ‘आत्या’ तर, चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होत.३८ वर्षे त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये मशीन सेक्शन अधिकारी पदावर कार्य केले.संजीवनी करंदीकर यांना काल सायंकाळी दीनानाथ हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी त्यांनी देह त्याग केला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट करत संजीवनी करंदीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्यातर्फे करंदीकर कुटूंबियांचे सांत्वन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री सायंकाळी अंत्यसंस्काराला उपस्थित रहाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.