जळगांव राजमुद्रा दर्पण|वाढत्या तापमानाने नागरिकांसह शेतकरी हैराण झाला आहे. देशात विविध भागात उष्णतेची लाट पडते आहे. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी रब्बी आणि जैद पिकांसोबत अनेक पिकांसाठी वेगवेगळे सल्ले दिले आहे.
गहू, मोहरी, मका, हरभरा या पिकांबाबत मत व्यक्त करतांना तज्ज्ञांनी शेतकऱ्यांची काढणी व मळणीबाबत विचारणा केली असता विशेषतः पिकलेल्या मोहरी पिकाची काढणी आणि मळणीसाठी हवामान असल्याचे सांगितले आहे. तूर, हरभरा, उडीद, मूग या पिकांना भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) तज्ज्ञांनी सायंकाळी हलके सिंचन करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर कुक्कुटपालन,रब्बी पिक,मोहरी पिक, मका पिक,जैद पिक,भाज्यां,फळ आणी प्राण्यांबाबत देखील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे सल्ले देण्यात आले आहे.