जळगाव राजमुद्रा दर्पण | उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या जळगांव शहरवासियांना लवकरच दिलासा मिळणार असल्याची शक्यता IMD कडून वर्तवण्यात आली आहे.
यंदा मान्सूनचे आगमन हे वेळेपूर्वीच होणार असून अंदमानमध्ये आठवड्याभरात पाऊस पडणार असल्याचे वृत्त भारतीय हवामान विभागाने (IMD) दिले आहे. त्याचप्रमाणे कोकणातही काही भागात 2 जून पर्यंत मान्सून बरसणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने मान्सूनसाठी पुढील चार आठवड्याचे अंदाजपत्रक जाहीर केले आहे.शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणूस पाऊसाची वाट पाहत असतो. मागील काही दिवसापासून महाराष्ट्रासह अनेक भागात उष्णतेने कहर केला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक चांगेलच हैराण झाले आहे. त्यातून आता लवकर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरवर्षी अंदमानमध्ये २२ मेपर्यंत मान्सून दाखल होतो. परंतु या वर्षी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १९ मे दरम्यान मान्सून हजेरी लावणार आहे. तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत तर केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.