जळगाव राजमुद्रा दर्पण | श्री संत सखाराम महाराज यात्रेला मोठ्या उत्साहात भक्ती भावाने सुरवात झाली आहे.१२ मे रोजी सायंकाळी ८ वाजता रथाची वाडी संस्थान मधुन ह भ प गादीपदी प्रसाद महाराज,आ.अनिल भाईदास पाटील, यांच्या हस्ते विधिवत पूजा करून जागेवरून रथ हलविण्यात आला. युथ फाउंडेशन तर्फे रथावर फुलांचा वर्षाव करून हिंदू- मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारा प्रसंग यावेळी दृष्टीस पडला.
माजी आ स्मिता वाघ, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, अँड ललिता पाटील, डॉ अनिल शिंदे, विनोद कदम , राजेश पाटील, उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ,अँड रवींद्र देशमुख,भैरवी पलांडे, राकेश पाटील, गौरव पाटील, मुक्तार खाटीक, राहुल गोत्राळ, सनी गायकवाड, ज्ञानेश्वर कुमावत,प्रवीण पाटील,प्रवीण पाठक, देविदास देसले, निलेश भांडारकर, धनदाई एज्युकेशनचे चेअरमन प्रा.डी डी खैरनार,पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, शहर तलाठी गणेश महाजन,तलाठी जितेंद्र जोगी, दिलीपराव देशमुख,
रियाज शेख,विश्वास संतोष पाटील,उमेश सोनार,उदय पाठक,मनोज भांडारकर यांच्यासह गावातील नागरिक व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.