राजमुद्रा वृत्तसेवा | कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं हत्यार आहे. मात्र गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकारकडून लसीकरणाबाबत दररोज माहिती दिली जात असून येत्या जून महिन्यात १२ कोटी लसींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम १ मे पासून सुरु झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशात २०.८६ कोटी करोना लशींचे डोस दिले गेले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अजूनही १.८२ कोटी लसींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. तसेच पुढच्या तीन दिवसात ४ लाखांहून अधिक डोस मिळतील असं सांगण्यात आलं आहे. कोरोना लसिकरणाचे महत्व लक्षात घेऊन सध्या देशभरात लसिकरणाचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे मात्र लसींच्या तुटवड्या अभावी बऱ्याच ठिकाणी नाराजी व्यक्त होत असताना ही दिलासादायक माहिती मिळाली आहे.