मुंबई राजमुद्रा दर्पण |महापालिका निवडणुकीसंदर्भातील मुंबई महापालिकेची अत्यंत महत्वाची बातमी. निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली असून, मुंबईच्या प्रभाग रचनेवर आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला वेग येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या २३६ सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबईतील वाढीव सदस्यसंख्या तसंच प्रभाग रचना निश्चितीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या अंतिम प्रभाग क्रमांक 1 पासून ते प्रभाग क्रमांक २३६ पर्यंतच्या प्रभाग रचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे, कोणता प्रभाग कोठून कुठपर्यंत असणार हे आता मुंबईकरांना माहिती होणार आहे. त्यानुसार निवडणुकीच्या कामाला गती येणार असून विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार ठरवतील. त्यामुळे लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे. शहरातील ३२ प्रभागात सुधारणा करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून करण्यात आला. ओबीसी राजकीय आरक्षणा शिवाय निवडणुका घ्याव्यात आणि दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याआधी महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करुन त्यावरील हरकती सूचनांची कार्यवाही १० मार्च रोजी पूर्ण केली होती. त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. त्याचे सादरीकरण आयुक्तांनी गेल्या मंगळवारी केले होते. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्यानुसार अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली.
आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग या पद्धतीने होणार आहे. त्यानुसार शहरातील ५८ प्रभागातून १७३ नगरसेवक निवडून येणार आहेत. ५७ प्रभाग तीन नगरसेवकांचे, तर एक प्रभाग दोन नगरसेवकांचा असेल. निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा शेवटचा आराखडा जाहीर झाला आहे.