मुंबई राजमुद्रा दर्पण | ज्यांना पोटदुखीची जळजळ आहे, त्यांच्यावर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील, असा टोला शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला.
देशात, महाराष्ट्रात राजकीय वातावरणात दुःख, गढूळपणाचे एक आभाळ पसरले आहे. या वातावरणावर आलेले मळभ, आजच्या सभेने दूर होईल. महाराष्ट्राचे आकाश स्वच्छ होईल आणि या आकाशात भगवा धनुष्य झलकेल.ज्या कुणाला काही शंका असतील, प्रश्नांचे समाधान झाले नसेल, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल, अशी ही सभा असणार आहे.आम्हाला गर्दीला बोलवावे लागत नाही. त्यामुळे आजची मुंबईतली सभा ही आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप असेल असे संजय राऊत म्हणाले.
संपूर्ण देशात फक्त एकच हिंदुहृदयसम्राटाचा जन्म झाला, आणि ते बाळासाहेब ठाकरे होते आणि भविष्यातही तेच राहणार आहेत. बाकीचे हिंदू जननायक, महानायक कोण हा प्रश्न देशात उपस्थित होण्याची गरजच भासत नाही, असे देखील राऊत म्हणाले.