जळगाव राजमुद्रा दर्पण | दुध संघात काम करणार्या धनराज बिरारी यांचा मुक्ताईनगरजवळील भीषण अपघातात शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला.
आर्थिक मदतीसाठी मयताच्या कुटुंबियांनी मृतदेह थेट दूध संघाच्या आवारात आणला. परंतु पोलिसांनी मयताच्या कुटुंबियांवर थेट लाठीचार्ज केला. लाठीचार्ज मुळे पळापळ झाली. शेवटी पोलिसांना मृतदेह मयताच्या घरी सोडावा लागला. शुक्रवारी झालेल्या या अपघातात धनराज बिरारी यांच्यासोबत चार जणांचा मृत्यू झाला. कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी ही नातेवाईकांची ईच्छा होती. परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नाही. अखेर, नातेवाईकांना आंदोलन छेडवे लागले. आंदोलनावेळी तिथे उपस्थित असलेले पोलीस उपअधिक्षक कुमार चिंथा यांनी मयाताच्या नातेवाईकांची समजूत काढली. दूध संघाकडून केवळ ५० हजाराची मदत आणि मायाताच्या पत्नीला कंत्राटी पद्धतीने नोकरी दिली जाईल असे तोंडी आश्वासन दिले. कुटुंबीयांनी त्यांच्या मदतीस नकार देऊन दूध संघा विरुद्ध घोषणा बाजी केली.
५ तास उलटूनही मदत न मिळाल्यामुळे नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि थेट ते दूध संघात प्रवेश करण्यासाठी पुढे सरसावले,तेवढ्यात पोलिसांनी
बेधुंद होऊन लाठीचार्ज केला. मात्र जिथे शेवट पर्यंत काम केले तिथेच मृतदेहाची प्रचंड विटंबना झाली.