जळगाव राजमुद्रा दर्पण | गव्हाच्या वाढत्या किमती पाहता केंद्र सरकारने गहु निर्यातीवर तात्काळ बंदी घातली असून, केंद्र सरकारने देशातील उपलब्ध गव्हाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गहू निर्यात ठप्प होणार आहे.
या निर्णयाचा जागतिक बाजारपेठेवरही मोठे परिणाम दिसून आले. निर्यातीवर बंदीबाबत केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये घोषणेच्या आधी किंवा त्या दिवसापर्यंत ज्या गव्हासाठी लेटर ऑफ क्रेडिट देण्यात आले आहे, त्याच प्रमाणात गव्हाची निर्यात केली जाणार आहे.गव्हाच्या उत्पादनात भारत हा दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे. असे असतानाही देशांतर्गत बाजारपेठेत झालेली दरवाढीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेन हे गव्हाचे उत्पादन घेणारे प्रमुख देश आहेत. युद्धामुळे या देशांकडून होणारा गव्हाचा पुरवठा खंडित झाला आहे. अशा परिस्थितीत भारतातून मागणी वाढली आणि निर्यातही वाढली.
आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढल्या असून त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात गहू आणि मैदाही महाग झाला आहे.