जळगाव राजमुद्रा दर्पण | आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. South Eastern Coalfields Limited ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहे. यासाठी पात्र उमेदवार २३ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतातो.
उमेदवारांना या पदासाठी फक्त नोंदणीकृत पोस्टद्वारे अर्ज करावा लागेल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला आठवी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच, उमेदवाराकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार शैक्षणिक पात्रता, वय यासंबंधी तपशीलवार माहितीसाठी अधिकृत वेबसाइट secl-cil.in वर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया टेस्टद्वारे केली जाईल. ज्याच्या तारखा वेबसाइटवर शेअर केल्या जातील.
अर्ज सुरू करण्याची तारीख – 2 मे 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख- 23 मे 2022
मेलद्वारे अर्जाची प्रत जमा करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2022