वॉशिंग्टन राजमुद्रा दर्पण |अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक भयानक घटना घडली. न्यूयॉर्कमधील सुपरमार्केटमध्ये हल्लेखोराने गोळीबार करत 11 लोकांना जखमी केले. यातील 10 लोक आपला जीव गमावून बसले.
न्यूयॉर्कच्या सुपरमार्केटमध्ये अज्ञात व्यक्ती घुसली. त्याने अंदाधुंद गोळीबार करत, यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोराने 13 जणांना गोळ्या घातल्या, त्यापैकी 11 कृष्णवर्णीय आहेत. न्यूयॉर्कमधील बफेलो येथील एका सुपरमार्केटमध्ये शनिवारी दुपारी अनेक जणांवर गोळीबार करण्यात आल्याने एकच खबराट निर्माण झाली. पोलिसांनी सांगितले की, बंदूकधारी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी सांगितले की, बफेलो येथील एका सुपरमार्केटमधील घटनेबाबत ती अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. अधिकाऱ्यांने सांगितले की, एक संशयित, जो जीवघेणा हल्ला करण्यासाठी रायफल घेऊन तयार होता. शनिवारी दुपारी हल्ला करण्यासाठी तो न्यूयॉर्क काउंटीमधील त्याच्या घरापासून काही तास दूर बफेलो येथे आला होता.
संशयिताची माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु त्याचे वय 18 वर्षे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्याच्या वेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा साठा होता.