मुंबई राजमुद्रा दर्पण | मागील काही दिवसांपासून काही बोबडे आपल्यावर टीका करत आहेत. त्यांनी केलेल्या टीकेवर आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, कर्तृत्वशून्य असल्यामुळे आपले लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हे शब्द उच्चारून उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला.
जेव्हा १ मे रोजी आम्ही महाराष्ट्र दिन साजरा करत होतो तेव्हा भाजपच्या सभेत फडणवीस चुकून बोलून गेले कि त्यांना मुंबई स्वतंत्र करायची आहे, त्यांच्या मालकाची इच्छा ते बोलून गेले. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या आल्या, तरी इथल्या मर्द मावळ्यामधे जिवंतपणा आहे. मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही, मिळवलेली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा जो कोणी प्रयत्न करेल, त्याचे तुकडे करू अश्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता. ते मास्क काढून म्हणाले की तुमच्याप्रमाणे मलाही आज मुक्त वाटतय आणि मी देखील बर्याच दिवसांनी मैदानात उतरलो आहे.सभेत म्हणाले कि, मी काही दिवसांपूर्वी गदा धरली होती. त्यांच्यावर टीका करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेनाही गधाधारी झाली आहे. हो आम्ही गधाधारी होतो, अडीच वर्षापूर्वीच आम्ही गध्याला सोडून दिले, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.