उदयपूर राजमुद्रा दर्पण | ‘एक कुटुंब , एक तिकीट, पक्ष संघटनेत ५० टक्के आरक्षण आदी महत्त्वाचे निर्णय काँग्रेस उदयपूर येथील नवसंकल्प चिंतन शिबिरात घेण्यात आले आहे.
भारताच्या राजकारणात पुन्हा एकदा आपले चित्र निर्माण करण्यासाठी आता काँग्रेस पक्षाने मोठे संघटनात्मक निर्णय घेतले आहे. उदयपूर येथे पार पडलेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसने या संघटनात्मक बदलाच्या ठरावांना मंजुरी दिली आहे. काँग्रेसमध्ये आता ‘एक कुटुंब, एक तिकीट’ असे धोरण लागू होणार आहे. त्याशिवाय पक्षात आरक्षणही लागू करण्यात आले आहे. या वर्षाअखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुकांसह आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेसचे प्रयत्न सुरु झाले आहे. मागील तीन दिवसांपासून राजस्थान येथील उदयपूर येथे ‘नवसंकल्प चिंतन शिबिर’ घेतले होते. या शिबिरात काँग्रेसने पक्षांतर्गत विविध मुद्यांवर चर्चा केली.
उदयपूर येथील नवसंकल्प चिंतन शिबिरात काँग्रेसने २० ठरावांना मंजुरी देत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.