मुक्ताईनगर राजमुद्रा दर्पण | माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोपांचे बाण सोडले जात आहेत. आमदार पाटील यांचे समर्थक आणि शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाळाभाऊ भालशंकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पदार्पण केले. येथे खडसे आणि पाटील गटात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगलेला असतांनाच , शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाळाभाऊ भालशंकर यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर शिवसेना माजी शहरप्रमुख बाळाभाऊ भालशंकर यांचे माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा आणि आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूत गिरणीच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, प्रवीण पाटील, संजू माळी, नंदू हिरोळे, बापू ससाणे, विनोद सोनवणे, दीपक साळुंके, योगेश काळे,राजू माळी, सोनू पाटील, प्रकाश खेवलकर, अप्पा नाईक, श्रवण पाटील आदींची उपस्थिती होती.