उदयपुर राजमुद्रा दर्पण | विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ५ राज्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचं चिंतन करण्यासाठी तसेच पक्षाला नवजीवन देण्यासाठी राजस्थानमधील उदयपूरमध्ये नवसंकल्प चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या चिंतन शिबिरात कांग्रेसने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
काँग्रसने घेतलेले हे निर्णय पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी निर्णायक भूमिका बजावू शकतात, असे म्हटले जाते. सत्ता आल्यास EVM बंद करू असा मोठा निर्णय काँग्रेसने घेतला. उदयपूरमधील काँग्रेसच्या नवसंकल्प शिबीरात काँग्रेसनं कात टाकण्याचे संकेत दिले आहेत. पक्षात यापुढे तिकीटवाटपात तरूणांना आणि महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.
त्याच बरोबर काँग्रेस ऑक्टोबरमध्ये देशव्यापी यात्रा करणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य जनतेशी काँग्रेसची नाळ जोडण्यासाठी ही देशव्यापी यात्रा ऑक्टोबरमध्ये काढण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून ही यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचा या यात्रेतून पक्षसंघटना मजबूत करण्याचा हेतू आहे.