मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्यसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रात्यक्ष उल्लेख न करता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांना इशारा देत ट्विट केले आहे.
रविवारी झालेल्या उत्तर सभेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिल्यानंतर सोमवारी राऊतांनी ट्विटद्वारे फडणवीसांना वैफल्यग्रस्त म्हटले आहे.संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत शिवसेनेची ताकद बघितली असल्यास मुंबईत या, असे म्हणत विरोधकांना छेडले होते. आपला पक्ष कोणापुढेही नमनार नाही, असे स्प्टीकरण त्यांनी दिले.तिथं मुख्यमंत्र्यांनीही ‘देवेंद्र तुम्ही गेला असतात ना तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती’, अशा शब्दात बाबरीच्या मुद्द्यावरुन फडणवीसांवर टीका केली होती. या साऱ्या टीकांना फडणवीसांनी सभेदरम्यान उत्तरे दिली.
मी बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझं वजन 128 होतं. वजनदार लोकांपासून सावध राहा”, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला.
“उद्धव ठाकरे म्हणाले फडणवीसांनी बाबरीवर पाय जरी ठेवला असता तरी बाबरी कोसळली असती. किती विश्वास आहे बघा. माझे आज 102 किलो वजन आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128 किलो इतके होते. उद्धव ठाकरेंना समजेल अशा भाषेत सांगतो. सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल तर माझा 1.5 आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझा एफएसआय 2.5 होता”, अशा प्रकारे टीकेची उत्तरे देण्याचा कार्यक्रम चालू होता. एकीकडे फडणवीसांना शिवसेनेला उत्तरे दिली आणि दुसरीकडे राऊतांनी अपघात अटळ म्हणत इशारा दिला.