वाराणसी राजमुद्रा दर्पण | कोर्टानं नेमलेल्या अॅडव्होकेट कमिशनरने शनिवारी सकाळपासून काशीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला सुरुवात करून ते सर्वेक्षण पूर्णत्वास नेले आहे.
मशिदीच्या आत जाऊन सर्वेक्षण करण्यात आले होते, त्याच बरोबरीनेच. सर्व वादी आणि प्रतिवादींच्या उपस्थितीत मशिदीच्या आत जाऊन व्हीडिओग्राफीदेखील करण्यात आली होती.
वाराणसी कोर्टाच्या एका बेंचने 12 मे रोजी मशिदीच्या आत व्हीडिओग्राफी करण्याचे आदेश दिले होते.
या सर्वेक्षणाची माहिती देताना वाराणसीचे पोलीस आयुक्त सतीश गणेश यांनी सांगितले, “आम्ही यासाठी वेगवेगळ्या स्तरावर सुरक्षा दिली होती. हा कोर्टाचा आदेश आहे, त्यामुळे त्यावर अंमलबजावणी करणे हे कर्तव्य आहे, याची जाणीव आम्ही सर्व पक्षांना एकत्र बसवून करून दिली.”आम्ही लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आणि सुरक्षासुद्धा केली. ज्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली ही कारवाई औपचारीकरित्या आता संपली आहे.”
या सर्व प्रकरणात जे काही सांगितलं जाईल त्यावर विश्वास ठेवा, असेदेखील सतीश गणेश म्हणाले.