मुंबई राजमुद्रा दर्पण | ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर तब्बल ११ वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. शर्मिला टागोर चित्रपटांमध्ये सक्रिय नसल्या, तरीही त्यांचा मुलगा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर मात्र बॉलिवूडमध्ये बऱ्यापैकी सक्रिय असल्याचे दिसून येते.
शर्मिला यांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला, ही बाब कोणीच नाकारू शकत नाही. त्यांचे काही चित्रपट नात एनाया हिने पाहिले आहे. पण, करिना आणि सैफची मुले, जे आणि तैमुर यांना मात्र माझे चित्रपट पाहण्याची परवानगी नाही, असेही त्या म्हणाल्या. दोन्ही नातवंडांनी आपले चित्रपट पाहिल्यास फारच अडचणी निर्माण होतील, असे त्यांचे मत आहे. सारा आणि इब्राहिम, जेव्हा जेव्हा आपले चित्रपट पाहतात तेव्हा ‘Well done’ इतकंच म्हणतात.त्या दोघांकडेही चित्रपट पाहिल्यानंतर बोलण्यासाठी काहीच नसते, असंही त्या म्हणाल्या. शर्मिला यांच्या चित्रपटांवर मिळणारी ही प्रतिक्रिया बहुधा पिढ्यांमध्ये असणाऱ्या अंतरामुळे असावी.
महत्वाचं हेच, की कुटुंबात इतकी दिग्गज अभिनेत्री असतानाही तैमूर आणि जे यांना त्यांच्या आजीच्या कलाकृती कधी पाहता येणार नाही.