श्रीलंका राजमुद्रा दर्पण | सोमवारी रात्री आठ वाजेपासुन मंगळवारी पहाटे पाच वाजेपर्यंत श्रीलंकेत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सध्या श्रीलंकेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून मंगळवारी पहाटे पाच वाजेपर्यंत देशव्यापी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत अनेक घडामोडी घडत आहेत. नुकताच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंकेतील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी पहाटे पाच वाजेपर्यंत देशभरात संचारबंदी लागू असेल. श्रीलंका सध्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अन्न, इंधनाचा तुटवडा, महागाई आणि वीज कपातीवरून श्रीलंका सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. श्रीलंकेतील अस्थिर परिस्थिती पाहता, भारताने मदत म्हणून काही आवश्यक गोष्टी पाठवल्या आहेत.
गेल्या आठवड्यात श्रीलंकेत झालेल्या हिंसाचारात नऊ जननी आपला जीव गमावला आहे. या हिंसाचारानंतर पोलिसांनी विविध आरोपांखाली दोनशे पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे.
श्रीलंकेच्या आर्थिक संकटासाठी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना जबाबदार ठरवले जात असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांच्या समर्थनार्थ आता नवे पंतप्रधान विक्रमसिंघे पुढे आले आहेत. त्यामुळे श्रीलंकेतील वातावरण जास्तच भिघडत चालले आहे.