मुंबई राजमुद्रा दर्पण | इथे उन्हाचा तडाखा वाढतोय आणि त्यातच सुट्टीच्या दिवशी बाहेर दिवस सार्थकी लावायला सर्वांनाच आवडते. सुट्टीच्या दिवसात अशा ठिकाणी दिवस घालवा जिथे सूर्यदेवाचा प्रकोप जाणवणार नाही, अस घरातले सर्वच जण म्हणत असतात. आणि अस ठिकाण आहे वॉटर किंग्डम..
वॉटर किंग्डम इथे धमाल राईड्स, अफलातून म्युझिक आणि जागतिक ख्यातीचे डीजे यांच्या तालावर ठेका धरत सध्या बरेचजण या ठिकाणाला पसंती देताना दिसत आहेत.
मिळेल त्या सुट्टीत पर्यटक वॉटर किंग्डमला भेट देण्यास पसंती दर्शवतात. घरातील लहान मुलांना उन्हाळी सुट्टी तर लागलीच असेल, मग वाट कसली बघताय, लवकरच वॉटर किंग्डम ला भेट द्या. आणि मनसोक्त आनंद लुटा.