मुंबई राजमुद्रा दर्पण | पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका, शिवसेना अपयश आले की म्हणायला सुरुवात करतात.
अडीच वर्ष मुंबई तोडण्याचा डाव आणि हिंदुत्व आठवलं नाही. हिंदुत्ववादी पक्षासोबत राहिलो तर पक्ष फुटेल असे शरद पवार म्हणाले होते. बाळासाहेब ठाकरे एक शब्द देऊन तोच कायम ठेवत होते . १९९९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी नेता आपल्या कार्यकर्त्यासाठी काय करु शकतो हे दाखवून दिले आहे. मी कुणाच्याही मंत्रिमंडळात मंत्री म्हणून राहणार नाही, असे बाळासाहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी आपण विरोधी पक्षात बसणार असल्याचे सांगीतले, असे नारायण राणे म्हणाले.
भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेमधून निवडून आलेले आमदार आणि खासदार यांच्यावर मोदींची कृपा आहे. त्यांचे ८च्या पुढे खासदार जात नव्हते. आमदारही १५ च्या पुढे जात नव्हते. आता असलेले ५६ ते देखील पडतील, असे नारायण राणेंचे तीक्ष्ण शाब्दिक बाण होते.
निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत आल्यास ५० हजारांची मदत करू असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यातील ५ हजार रुपये तरी दिलेत का, असा सवाल राणे यांनी केला. मुंबईतील मराठी माणूस शिवसेनेमुळे वसई,विरार कदे गेला असा आरोप राणेंनी केला. मुंबईत एका मातोश्रीच्या दोन मातोश्री झाल्या अस देखील नारायण राण म्हटले आहे.