जळगाव राजमुद्रा दर्पण |तालुक्यातील बामणोदमधील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत डॉ. नरेंद्र कोल्हे यांच्या पॅनलला बहुमत मिळाले. १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. कोल्हे यांच्या पॅनलने ९ जागा जिंकल्या. तर विरोधी गटाला एक बिनविरोधासोबत ४ जागा मिळाल्या.
रविवारी मतदान होत, सायंकाळी मतमोजणी पार पडली. या मध्ये भाजपचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. नरेंद्र वामन कोल्हे यांच्या पॅनलने बहुमत प्राप्त केले. यात १३ पैकी ९ जागा त्यांनी जिंकल्या आहेत. यानिवडणुकीत प्रारंभी अक्षय जितेंद्र तायडे हे बिनविरोध निवडून आले. तर १२ जागांसाठी २४ उमेदवार होते. यामध्ये डॉ. नरेंद्र कोल्हे यांच्या पॅनलचे स्वत: डॉ. कोल्हे ३१३ मते, प्रल्हाद घनश्याम केदारे २९७ मते, प्रशांत नरेंद्र सरोदे २६१ मते, अनंत तुळशिराम फेगडे २६० मते, पुरूषोत्तम प्रकाश भोळे २१८ मते, दिनकर पंढरीनाथ भंगाळे २५९ मते, चंद्रकांत भागवत तळेले २४४ मते, दीपक देवराम नेहेते २३७ मते, सुवर्णलता नरेंद्र कोल्हे २७४ मते, मिळवत हे डॉ. कोल्हेंच्या पॅनलचे ९ संचालक विजयी झाले. तर विरोधी गटातील अक्षय तायडे बिनविरोध तर गोरख जयसिंग चौधरी २१० मते, प्रमोद अशोक बोरोले ३६१ मते, कुमुदिनी लिलाधर जावळे १८४ मते असे अजून ४ उमेदवार विरोधी गटाचे निवडून आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. पी. भारंबे यांनी तर सहकारी म्हणून डी. के. भारंबे, विजयसिंग पाटील, प्रकाश झोपे, आर. जी. राऊत आदींनी कामकाज पाहिले. सर्वांनी निवडून आल्यानंतर जल्लोष करीत आनंद साजरा केला.