नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याच्या घरावर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. चेन्नई आणि दिल्ली येथील घरांवर सीबीआयने छापेमारी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापा टाकला असून, सीबीआय कार्ती चिदंबरमच्या दिल्ली आणि चेन्नईतील 7 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. परंतू ही छापेमारी का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झाले नाही, याबाबत सीबीआयकडून कोणत्याही प्रकारची माहिती सांगण्यात आली नाही. पी चिदंबरम हे काँग्रेस पक्षाचे सरकारमध्ये अर्थमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. सीबीआयने ही छापेमारी का टाकली आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल.