मुंबई राजमुद्रा दर्पण | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) शेअर बाजारात उतरली आहे. IPO BSE आणि NSE यावर 8 ते 9 टक्के घसरणीसह लिस्ट झाला. यापूर्वीही मार्केट एक्सपर्ट्सने देखील एलआयसीच्या शेअर्सची घसरण होऊन सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवली होती.
विमा कंपनीच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची निराशा केली. LIC चा स्टॉक बीएसई वर 81.80 रुपये (8.62% ) च्या घसरणीसह Rs 867.20 वर सूचीबद्ध झाला. त्याच वेळी, हा शेअर NSE वर 77 रुपयांच्या घसरणीसह 872 रुपयांवर सूचीबद्ध झाला.
20,557 कोटी रुपयांच्या या IPO साठी सरकारला देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून मोठी प्रतिक्रिया मिळाली. या शेअरसाठी सरकारने 949 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला होता. त्याचबरोबर, पॉलिसीधारक आणि किरकोळ गुंतवणूकदारांना रु. 889 आणि रु. 904 प्रति शेअर वाटप करण्यात आले.