पुणे राजमुद्रा दर्पण | पुण्यात एक यात्रा सुरू होती …. यात्रेला मोठ्या प्रमात गर्दीही जमली होती…. आणि जमलेल्या गर्दीत अचानक टेम्पो शिरला..
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.दरम्यान, टेम्पोने दिलेल्या धडकेत 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
धनकवडी गावात यात्रा सुरु असताना गर्दीत अचानक टेम्पो शिरल्याने यात्रेत एकच खळबळ उडाली. सजावटीसाठी रस्त्यावर लावलेल्या डिजिटल फलकासह टेम्पोने दुचाकींनाही धडक दिली. या अपघातात सनी दत्ता ढावरे (16, रा. सहकारनगर) या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. टेम्पो चालक रुपेश बळीराम मालुसरे (19, रा. कोंढवा ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच टेम्पोमालक दत्ता घनवट याच्या विरुद्ध देखिल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.