नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | महाराष्ट्रातल्या निवडणुका कधी होणार याबाबतचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात घेणार आहे. नेमक्या कधी होणार याबाबत महत्वाचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होईल. यासंदर्भात निवडणूक आयोगाने आपली याचिका 13 तारखेला सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यावर 17 मे रोजी दुपारी 2 वाजताची वेळ सुनावणीसाठी निश्चित केली आहे. आयोगाकडून महापालिका नगरपंचायती निवडणूक सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्टोबरमध्ये घेण्याचे याचिकेत नमूद केले आहे.
राज्यात निवडणुका पावसाळ्यानंतर आणि त्याही महापालिका, नगरपंचायती एकावेळी तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीनंतर अशा दोन टप्प्यात निवडणुक घेण्याची शक्यता आहे. राज्यातील जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या असे राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केलेली ही विनंती मान्य होणार का यावर राज्यातल्या निवडणुकांचे भविष्य ठरणार आहे. तसे झाल्यास गेल्या दोन अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका शहरी आणि ग्रामीण अशा दोन टप्प्यांत, पावसाळ्यानंतर पार पडण्याची शक्यता आहे. त्यामूळे पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यात सुप्रीम कोर्ट मान्यता देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.