भारत राजमुद्रा दर्पण | भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे नवीन दर जाहिर केले असून आजही त्यात कोणत्याच प्रकाचा चढ उतार नाही. गेल्या दिड महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत सातत्याने चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमती 110 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. तरिदेखील पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. त्यामुळे काही दिवस का होईना सामान्य माणसाच्या जीवाला धीर आहे.
मार्च-एप्रिलमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 10.20 रुपये प्रति लिटरची वाढ झाली होती. यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली होती. प्रत्येकी 80-80 पैशांची वाढ पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत करण्यात आली होती. दरम्यान, कच्या तेलाच्या दरात प्रति बॅरल110 डॉलरच्या वर राहिल्यास तेल कंपन्या पुन्हा एकदा किमती वाढवू शकतात अशी शक्यता दिसते आहे.