जळगाव राजमुद्रा दर्पण | पहिल्यांदा भाजप सरकार येण्यामागे सुषमा स्वराज यांचे मोलाचे योगदान आहे. सुषमा स्वराज या देशातील मोठ्या महिला नेत्या आहे. भाजप सरकार आल्यावर सरकारने सुषमा स्वराज यांना मंत्रीच काय तर खासदार देखील केले नाही. जो स्वतःच्या घरातील महिलांवर अन्याय करतो तो तुमचा काय विचार करणार असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडला आहे.
मोदी सरकार आणि महागाई विरोधात जळगाव शहरात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे भव्य आंदोलन होते . या आंदोलनाला संबोधित करताना खा.सुप्रिया सुळे बोलत होत्या. खा.सुळे म्हणाल्या, पेट्रोल, डिझेल भाववाढ झाल्याने लिंबाचे दर देखील महागले. २०१४ मध्ये गॅस सिलेंडरचे दर ३५० रुपये होते आज १ हजार रुपये आहे. तेव्हा मोदी म्हणायचे बहोत हो गयी महंगाई कि मार, अबकी बार मोदी सरकार. आज मी मोदींना विचारते बहोत हो गयी महंगाई कि मार, बस करो मोदी सरकार. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली असे ते सांगतात. त्याचा आणि आपल्या देशाचा काय संबंध? इथे आमचे आधारकार्डचे वांधे आहेत आम्ही कुठे युक्रेनला जाणार? आमचे सरकार होते तेव्हा सुषमा स्वराज आम्हाला बोलत होत्या. जेव्हा भूक लागते तेव्हा युक्रेन आम्हाला दिसत नाही. हेलिकॉप्टर, नेत्यांना सर्वसामान्य लोकांचे दुःख काय कळणार? जानेवारीत हिजाब काढला, फेब्रुवारीत काश्मीर फाईल्स काढले, मार्चमध्ये भोंगे काढले, एप्रिलमध्ये हनुमान चालीसा काढली, मेमध्ये काय काढले तर ताजमहाल काढला, जूनमध्ये काय तर ज्ञानव्यापी काढले, ही सर्व करणे नागरिकांना समोर ठेऊन त्यांचे लक्ष विचलित करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. असे देखील खाजदर सुप्रिया सुळे आंदोलनात म्हणाल्या.
नाथाभाऊंवर अन्याय झाला, त्याबरोबरच सुषमा स्वराज यांच्यावर अन्याय झाला. आपल्यावर शाहू, फुले, आंबेडकरांचे संस्कार आहेत. आपण जे करू ते सुसंस्कृतपणे करणार. देशात जे-जे वाईट होते ते यांच्याच काळात होते आहे. सुषमा स्वराज यांना न्याय मिळाला नाही तर आपल्याला कुठे मिळणार? अस देखील त्या म्हणाल्या.