जळगाव राजमुद्रा दर्पण | सध्या जिल्ह्यात चोरीचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. चीर्त्यांना तर पोलिसांचा धकाच राहिलेला नाही. कधी शेती साहित्याची चोरी तर कधी घरफोडीसारख्या घटना अशा विविध प्रकारे चोरट्यांचा कहर सुरुच आहे. अशातच आता यावल तालुक्यातील फैजपूर-बामणोद मार्गावरील एकवीरा माता मंदिरातील दानपेटी, चांदीचा मुकुट व चांदीचे छत्र अज्ञात चोरट्यांनी लांबवले. या घटने मुले परिसरात खळबळ माजवली आहे.
एकवीरा मातेच्या देवस्थानात १४ रोजी रात्री ९ ते १५ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे स्टीलच्या गेटचे कुलूप तोडले. लाकडी दरवाजा जोरात आत ढकलून आत प्रवेश केला. यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यातून देवीचा चांदीचा मुकुट व चांदीचे छत्र, दानपेटी चोरून नेली. या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे ३१ हजार ४०० रूपये आहे.
दरम्यान, चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी आजूबाजूला शोध घेतला. त्यात रोडच्या पलीकडे असलेल्या कापसाच्या शेताच्या उत्तर बांधालगत मंदिरातील दानपेटी फोडलेली दिसली. मात्र, त्यातील रक्कम गायब होती.
याबाबत रमेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गोकुळ तायडे करत आहे. दरम्यान, चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी आजूबाजूला शोध घेतला. त्यात रोडच्या पलीकडे असलेल्या कपाशीच्या शेताचे उत्तर बांधालगत मंदिरातील दानपेटी फोडलेली दिसली आणि त्यातील रक्कम गायब होती. याबाबत रमेश सोनवणे यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गोकुळ तायडे करत आहे.