पुणे राजमुद्रा दर्पण | 21 मेला पुण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा मुठा नदीपात्रात होणार आहे. अर्थात परवानगीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्थळ निश्चित करणे सुरु राहणार हा भाग वेगळाच…मुळात राज ठाकरे यांनी पुण्यात वाढवलेले लक्ष आणि आयोजित केलेली सभा यातून कोणता हेतू साध्य केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मनसेच्या रिलॉन्चनंतर रेल्वे इंजिनाला गती देण्याचा राज यांचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून यंदाचा पाडवा मेळावा, त्यांनतर ठाणे, औरंगाबाद या ठिकाणी एकापाठोपाठ झालेल्या सभा, या सभांमधून दिला गेलेला भोंगे हटावचा नारा, अयोध्या दौऱ्याची घोषणा या सगळ्या घडामोडींकडे पहावे लागेल. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यात काय घडतंय याला महत्त्व प्राप्त होते. पक्ष संघटना मजबूत करणे, पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवणे आणि या दोन्ही गोष्टी साध्य करत असताना सत्तेच्या सारीपाटावर स्वतःचे त्याचप्रमाणे पक्षाचे स्थान बळकट करणे असा कार्यक्रम राज ठाकरे यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रश्नच नाही. पुढच्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, विशेष करून महापालिकांच्या निवडणुका हे त्यांचं प्रमुख लक्ष्य आहे. पुण्यामध्ये कधीकाळी मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते, एक आमदार निवडून आला होता.
शहरातील एकूण नगरसेवकांची संख्या अवघी 2 इतकी आहे. आजच्या घडीला आमदार सोडा, अश्या परिस्थितीत पक्षाचे भविष्य काय घडणार हा प्रश्न स्थानिक नेते आणि कार्यकर्ते दोघांनाही पडला आहे.