जळगाव राजमुद्रा दर्पण | सोन्याच्या काल झालेल्या दरवाढीनंतर आज बुधवारी सोन्याच्या भावात काही प्रमाणात घसरण झाली. मात्र चांदी तिसऱ्या दिवशी महागली. बुधवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचे दर ८० रुपयांनी घसरून चांदी प्रति किलो २४० रुपयांनी महागली आहे. याअगोदर सोने ३९० रुपयांनी तर चांदी तब्बल १६३० रुपयांनी महागली होती. त्यामुळे आता चांदीचा भाव गगनाला र असल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी सोने प्रतीताेळा ५१,३५० रुपायांवर आले आहे. तर चांदीचे दर प्रति किलो ६२,५९० रुपयांवर पोहोचले आहेत.दरम्यान, सोन्याचे दर हे दिवसातून दोनदा जाहीर होतात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायकांळच्या वेळेस. त्यामुळे सोन्याच्या भावड बदल दिसून येतो.
मागील दोन ते तीन आठवड्यापासून सोन्या आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण दिसून आली. सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. विवाह समारंभात सोन्याला मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या देशात सोन्याची मागणी वाढली आहे. मात्र तरी देखील सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून स्वस्त होत असल्याचे पहायला मिळत आहेत.
महिन्यापूर्वी चांदीचा भाव ७० हजार रुपयांवर होता. तो आता ६२ हजारांवर गेला आहे. महिन्याभरात चांदी तब्बल ७ ते ८ हजार रुपयाने स्वस्त झाली आहे. तर, एप्रिल- मे अगोदर ५४ हजार असलेला सोन्याचं अभाव आता ५१ हरंवर आला आहे. म्हणजेच गेल्या महिन्याभरात सोने जवळपास ३ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.