जळगाव राजमुद्रा दर्पण | तांबापुरा परिसरात मंगळवारी दोन गटात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतरण हाणामारीत होऊन दगडफेक देखिल झाली. दोन्ही गटातील तरुणांनी काचेच्या बाटल्या विटा दगड यांचा उपयोग करत दगडफेक केली. हा सर्व प्रकार पोलिसांना समजल्यावर तात्काळ त्यांनी घटनास्थळ गाठून संशयितांना ताब्यात घेण्याचे करू सुरु केले आहे.
मासुमवाडी परिसरात देखील दोन गटात वाद झाला होता. दोन्ही घटनेत ५ पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे समजते. मेहरूण परिसरात असलेल्या तांबापुरा भागात मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दोन तरुणांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतरण हाणामारीत झाल्याने दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक सुरू झाली. बिस्मिल्ला चौकाजवळून वाद सर्व परिसरात पोहचला.
दंगेखोरांनी केलेल्या दगडफेकीत मोठे नुकसान झाले असून एक दुचाकी, पाण्याच्या टाकीची तोडफोड झाली आहे. काही घरांच्या काचा फुटल्या असून परिसरात दगड, विटा, काचा सर्वत्र पसरलेल्या होत्या. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले, इतर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे. दरम्यान, मासुमवाडी परिसरात देखील दोन गटात वाद झाला होता. सध्या परिस्थीती शांत असून नियंत्रणात आहे. दोन्ही घटनेत ५ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. पोलिस संशयितांची माहिती काढून शोध घेत आहे.